गावामध्ये पूर्वी पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई जाणवत होती. गावाला नदी नसलेने कायम स्वरुपी पाण्याची सोय नव्हती. पूर्वी गावाच्या पूर्व बाजूला असणा-या आडातून गावाला पाणी पुअरवठा केला जात असे. हे पाणी उन्हाळ्यामध्ये अपुरे पडत असलेने, ग्रामस्तांनी सन 2008 मध्ये लोकवर्गणीमधून, कोगिल खुर्द रोडला एक विंधन विहिर धेऊन त्याचे पाणी गावच्या दक्षिण बाजूस असलेल्या विहिरीमध्ये आणून टाकले व ते पाणी गावाला सध्या पुरवठा केले जाते त्यामुळे गावामध्यी गेल्या दोन वर्षापसून पाणी टंचाई जाणवत नाही. या कामासाठी तत्कालिन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचे विशेष प्रयत्न आहेत.
त्याचबरोबर गावच्या दक्षिण बाजूस किगिल गावच्या बाजूस एक पाझर तलाव असून त्यामध्ये पाणी साठा असून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. याचे नियोजन करणेसाठी महलक्ष्मी पाणी पुरवठा सह. संस्था स्थापन केली आहे. नियोजनाचा फायदा शेतक-यांना चांगलाच होत आहे.